डिजिटल क्लासरूम
नरंदे हायस्कूलमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधेचे क्लास रूम्स उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित न होता ते व्यवस्थित पणे अभ्यास करू शकतील अशा पद्धतीने क्लास रूम्स बनविल्या आहेत. विद्यार्थ्यांना उत्तम शिकता यावे यासाठी क्लासरूम मध्ये एल.सी.डी. प्रोजेक्टर बसवण्यात आले आहेत. प्रत्येक क्लास रूम मध्ये आवश्यक अशा सर्व फर्निचरचा वापर केला आहे. नरंदे हायस्कूल मधील क्लासरूम मध्ये आम्ही फक्त विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणच नव्हे तर शिक्षणाचा आनंद ही मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.निसर्गरम्य अशा वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अनुभव घेता येतो.

