आमचे आधारस्तंभ श्री. शिवाजीराव देशमुख. संस्थापक मनोगत श्री.प्रतापराव अ. देशमुख बी.ए.,बी.पी.एड.

विद्याधन संवर्धन प्रधानम , ह्या ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने नरंदे ता. हातकणंगले येथे१९८९ साली मा.श्री.प्रतापराव देशमुख यांनी नागनाथ एज्युकेशन सोसायटी नरंदे ची स्थापना केली. विद्यालयीन शिक्षणाकरिता मुला – मुलींना बाहेरगावी जावे लागत असे. त्यामुळे शिक्षणाबद्दल उदासीनता होती. नरंदे गाव त्याचबरोबर पंचक्रोशीसह गावातील मुलांच्या शिक्षणाच्या द्वारे विकास व्हावा , त्यांना शिक्षण घेता यावे ह्या उदात्त हेतूने नरंदे गावामध्ये हायस्कूल सुरु केले. १० ऑक्टोबर १९९०  अवघ्या १८ विद्यार्थ्यांच्या साक्षीने सुरु केलेले हायस्कूल आज जवळपास १००० विद्यार्थी संख्येच्या आसपास पोचले आहे. विद्यालयाचा परिसर साडे तीन एकरामध्ये असून विविध सुखसुविधा आणि सुसज्य आहे.

          नागनाथ एज्युकेशन सोसायटी अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग कार्यरत आहे. यामध्ये प्रामुख्याने निवासी संकुल (मुले), इंग्रजी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम चे शिक्षण इयत्ता ५ वी. पासून ११ वी पर्यंत आहेत.प्रशालेमध्ये नर्सरी, प्ले ग्रुप, ज्युनि. केजी , सिनिअर  के.जी. इयत्ता १ ली. चे वर्ग सुरु आहेत. सर्व स्टाफ हा उच्च विद्याविभूषित असून अनुभवी स्टाफ कार्यरत आहे. तसेच इयत्ता ९ वी. व १० वी. च्या विद्यार्थ्यांना JEE / NEET / CET / IIT / NDA च्या फौंडेशन कोर्सची  सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच इयत्ता ११ वी सह JEE / NEET / CET / IIT / NDA ची परीपूर्व तयारी होण्याच्या अनुषंगाने  इयत्ता ११ वी सायन्स चा वर्ग कार्यरत आहे.

          विद्यालयाचा शिक्षक वृंद उच्च शिक्षित व अनुभवी आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते.तसेच विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण व इ-लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी टिकावेत हा हेतू घेवून विद्यार्थ्यांना N.T.S., M.T.S., N.M.M.S., स्कॉलरशिप, बीटीयस इत्यादी परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. विद्यालयात शिक्षक पालक संघ असून गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात.विद्यार्थ्यांनी खेळातून यश संपादन करावे म्हणून विविध क्रीडा स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन केले जाते.  विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक स्थळांची माहिती व्हावी म्हणून शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते.

          विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा म्हणून तसेच प्रयोगशील अध्ययन व्हावे म्हणून विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध आहे. वाचन संस्कुती जोपासण्यासाठी ग्रंथालय ही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान व्हावे म्हणून संगणक कक्ष उपलब्ध करून दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी खेळातून विकास साधावा म्हणून व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केट बॉल, अॅथलेटीक्स, कॅरम, बुद्धीबळ, रायफल शुटींग इ. खेळांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन केल्याने विद्यार्थी जिल्हा , राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करत आहेत.

          महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी संकुल कार्यरत आहे. माफक फी मध्ये सर्वांगीण विकास ध्येय ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. इथला प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक उपक्रमामध्ये भाग घेवून स्वताला सिद्ध करतो बौद्धिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी संस्था नेहमीच अभिनव उपक्रम राबवते. निवासी संकुलाच्या विद्यार्थ्यांनी शालेय तसेच सहशालेय उपक्रमामध्ये भाग घेवून स्वताला नक्कीच सिद्ध केले आहे.

निवासी विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांनी सुसज्य असे वसतिगृह आहे. निवासी विद्यार्थ्यांसाठी गरम व थंड पाण्याची सोय असून अनेक प्रकार त्यांना उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थ्यांना सकस व संतुलित आहार दिला जातो. सण, उत्सव व समारंभाच्या वेळी गोड पदार्थ देऊन त्यांना घरच घरपण दिले जाते. निवासी विद्यार्थ्यांना दिनचर्या सकाळी ५:४५ वाजता सुरु होते. तर रात्री 10:०० वाजता  संपते.ह्या अंतगर्त त्यांचा सकाळचा व्यायाम, वर्तमानपत्र वाचन, स्पोकन इंग्लिश , तासिका , नियमित तासिका व इतर उपक्रम घेतले जातात. ह्या निवासी संकुलामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील विविध गावातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आले आहेत.अनेक विद्यार्थ्यांनी विविध खेळात,राज्य व राष्ट्रीय  स्तरावर  यश संपादन केले आहे. गेल्या तीस वर्षात अनेक विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर आले आहेत, कांही विद्यार्थी परदेशात शिकत आहेत.कित्तेक विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर व अन्य सेवात नावलौकिक प्राप्त करत आहेत. हि अभिमानाची गोष्ट आहे. अनेक विद्यार्थी स्वावलंबनावर उद्योगधंदे व अन्य क्षेत्रात सेटल झाले आहेत. तर काहींनी विविध स्पर्धा परीक्षेतून आपले करिअर उज्वल बनवले आहे.

          हे निवासी , अनिवासी ज्ञान संकुल ज्ञानाचा दिवा घरोघरी प्रज्वलित करून खऱ्या अर्थाने ज्ञानमातेची सेवा करत आहे. नागनाथ एज्युकेशन सोसायटी नरंदे हायस्कूल नरंदे, निवासी अनिवासी संकुल , डी.एड.कॉलेज नरंदे, मध्ये आपले स्वागत आहे.